मुंबई : शहापूरच्या काही शिवसैनिकांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले असता, भगवान काळे या शिवसैनिकाचा हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परंतु या बद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दाखल अथवा विचारपूस केली गेली नाही. मात्र, ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच, त्यांनी काळे यांच्या कुटुंबाची फोनवरून चौकशी करून त्यांच्या कुटुंबाला पैश्याची मदत केली.
शहापूर तालुक्यातील वाशाळा गावचे शिवसेनेचे पदाधिकारी भगवान काळे, हे पक्ष बैठकीच्या निमित्ताने मातोश्री येथे गेले होते. बैठकी दरम्यान अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांना तात्काळ कलानगर रुग्णालयात हलवण्यात आले . परंतु वाटेतच काळे यांचा मृत्यू झाला.
घरातील कर्त्यापुरुषाच्या मृत्यूमुळे काळे यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकानी आपल्या कार्यकर्त्याची व्यथा पोहचताच, ते लोकनाथ असल्या प्रमाणे आमच्या मदतीला धावून आले, असे काळे यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी काळे यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचा शब्द दिलेले आहे, असे त्यांच्या मुलीच्या वतीने सांगितले गेले. ही मदत उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित होती, कारण काळे हे शिवसेनेच्या बैठकीच्या निमित्ताने मातोश्रीवर गेले असता त्यांचा मृत्यू झाला, असा प्रश्न या वेळी उपस्थित केला गेला.