गुजरात दंगल प्रकरणः माजी आयपीएस संजीव भट्टला गुजरात गुन्हे शाखेकडून अटक

बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी घेतले ताब्यात

    13-Jul-2022
Total Views |
संजीव
 
 
 
 
 
अहमदाबाद: गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालनपूर तुरुंगात असलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना दि. १२ जुलै रोजी अटक केली. गुजरात दंगलीप्रकरणी पोलिसांनी माजी वरिष्ठ अधिकारी आरबी श्रीकुमार आणि कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी ही अटक झाली. पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
 
भट्ट यांना १९९० मध्ये कोठडीतील मृत्यूप्रकरणी तुरुंगात ठेवण्यात आले होते. जामनगर सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुन्हे शाखेने त्याला कारागृहातून अटक करून मंगळवारी अहमदाबादला हलवले. झाकिया जाफरी खटल्यातील नुकत्याच दिलेल्या निकालात सुप्रीम कोर्टाने तीस्ता सेटलवाड, श्रीकुमार आणि भट्ट यांना खोटे पुरावे दिल्याबद्दल फटकारले. कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की सेटलवाड यांनी खटल्यांच्या वेळी साक्षीदारांना शिकवले आणि 'प्रकरणात भांडे उकळत ठेवले. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते की या प्रकरणातील एसआयटी तपासात असे दिसून आले आहे की भट्ट आणि श्रीकुमार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर दंगल सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याचा आरोप करणारी विधाने खोटी होती. या दोघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेले निष्क्रियतेचे आरोपही बनावट असल्याचे न्यायालयाने नमूद केले.