शंभूराजे देसाईंना कोरोनाची लागण

    11-Jul-2022
Total Views |
shambhu raje 
मुंबई : शिंदे गटातले पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. दि ११ जुलै रोजी शंभूराजें देसाईंची कोरोनाची चाचणी केली, अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते मुंबईतील सुरुची या शासकीय निवासस्थानी गृह विलगीकरण उपचार घेत आहे. प्रकृती चांगली असून डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.
 
 
"चार - पाच दिवसांत, मी पूर्ण बरा होईन. त्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी." असे शंभूराजे देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.