गोवा : गोव्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ११ जुलै पासून होणार आहे. त्याच्या आधीच राज्यात राजकीय खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्रानंतर आता गोव्यामध्ये देखील 'ऑपरेशन लोटस' राबवले जाणार आहे. गोव्यामध्ये आधीच भाजपचे सरकार आहे. तरी विधिमंडळातील काँग्रेसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजप हे ऑपरेशन राबवणार आहे.
काँग्रेसचे ९ आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आजच्या दिवशी बरोबर ३ वर्षांनी याच घटनेची पुनरावृत्ती होणार शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह काही आमदारांचा गट भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गोव्यातील विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या आधीच राजकीय खळबळ होणार आहे.