हे तर ढोंगी पर्यावरणवादी नितेश राणेंनी केली ठाकरेंची पोलखोल

    01-Jul-2022
Total Views |

nitesh
 
 
 
मुंबई : "माजी मुख्यमंत्र्यांना जर मुंबईच्या पर्यावरणाचे एवढेच प्रेम होते तर त्यांनी स्वतःच्या पर्यावरण मंत्री मुलाने बांधलेला पवई सायकल ट्रॅक का नाही रोखला" अशा शब्दांत पलटवार करत भाजप आमदार नितेश राणे ठाकरेंची पोलखोल केली. स्वतःच्या मुलाने सुरु केलेल्या प्रकल्पांनी तर पर्यावरणाचे कायमचे नुकसान केले होत तेव्हा कुठे गेले तुमचे पर्यावरण प्रेम अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंच्या ढोंगी पर्यावरणप्रेमाचा बुरखा फाडला. स्वतःच्या मुलाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि आता मुंबईच्या हिताच्या प्रकल्पांना विरोध का करता ? असे सवाल राणेंनी केले आहेत.
 
 
 
 
 
 
 
मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कांजूरमार्ग येथे होणारी मेट्रो कारशेड आरे मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला त्याला विरोध म्हणून यांनी हे वक्तव्य केले. पण स्वतः मुख्यमंत्री असताना, स्वतःच्या मुलाने पर्यावरणाचे कायमचा विध्वंस करणारे निर्णय का रोखले नाहीत? असा सवाल विचारत नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.