विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    08-Jun-2022
Total Views |
 
shreekant
 
 
 
मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेले श्रीकांत भारतीय यांनी विधानभवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार जयकुमार रावल उपस्थित होते. उमेवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून भाजपकडून उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज त्या दिवशी भरला जाईल.
 
 
 
 
भाजपकडून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपने संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांना संधी देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. यानुसार भाजपच्या उमेदवारांमध्ये संघटनेत अनेक वर्षे काम करणाऱ्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे.