मुंबई : काश्मीरी हिंदूंवर होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. मंगळवार, दि. ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'आयआयटी बी फॉर भारत'द्वारे या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. इस्लामिक जिहादींतर्फे काश्मीरी हिंदूंच्या भर दिवसा हत्या केल्या जात आहेत. आयआयटी कॅम्पसमध्ये या सर्व मृतात्म्यांना सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयआयटीचे आजी माजी प्राध्यापकही उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंच्या हत्या प्रश्नावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या घोषणांसह दहशतवादीविरोधात आवाज उठण्यात आला. 'आयआयटी बी फॉर भारत'तर्फे वेळोवेळी अशा देशविरोधी कृत्यांचा निषेध केला जातो. तसेच महाविद्यालय परिसरात विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात. डाव्यांकडून पसरवल्या जाणाऱ्या भ्रमांचा पर्दाफाश करण्याचे काम आम्ही सातत्याने करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आयआयटी कॅम्पसमध्ये सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी त्या शेकडो भारतीयांसाठी संवेदना व्यक्त केल्या. काश्मीरी हिंदूंना स्वतंत्र भारतातही जिहादींद्वारे सुरू असलेल्या अत्याचाराला बळी पडावे लागत आहे. काश्मीरी घाटीतील फुटीरतावाद्यांकडून राष्ट्रविरोधी सूर बळावत आहे. सुमारे अकराशे वर्षांपासून भारतीय संस्कृति आणि समाज याचा विरोध झेलत असल्याची खंत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
'१९ जानेवारी १९९०च्या रात्री ज्यावेळी असंख्य काश्मीरी हिंदुंच्या हत्या आणि बलात्कार आणि नरसंहाराच्या घटना घडल्या. त्यावेळी अनेक काश्मिरी हिंदूंनी आपले घर, संपत्तीचा त्याग करावा लागला. आपल्या नातेवाईकांना मुखाग्निही त्यांना देता आला नाही. आज पुन्हा एकदा इतिसाहाची पूनरावृत्ती होत आहे.' काश्मिरात हिंदूंच्या घरांबाहेर नावे लिहून त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. 'काश्मीरी घाटी खाली करा', असे निर्देश परिपत्रकांद्वारे दिले जात आहेत.
'दोन दिवसांपूर्वीच ३६ वर्षीय शिक्षिका श्रीमती रजनी बाला यांना दहशतवाद्यांनी ठार केले. दहशतवाद्यांनी त्यांना शाळेत घुसून ठार केले. असाच प्रकार राहुल भट्ट तसेच विजय कुमार बेनीवाल यांच्याही अशाच हत्या झाल्या. ही यादी वाढत चालली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांना घरात बंदीस्त केले जात आहे. बाहेर सुरक्षारक्षक आहेत. मात्र, तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या विधवा पत्नीवर संकट कोसळलेले आहे.'
विजय कुमार यांची चुलत बहिण आयआयटी मुंबईची विद्यार्थीनी आहे. त्यांना आपले दुःख अनावर झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गेल्या ११०० वर्षांपासून या कुटूंबांचे दुःख असह्य आहे. एका कट्टरपंथी विचारधारेचे शिकार बनलेला मोठा जनसमुदाय आज त्याचे दुःख भोगत आहे. काश्मीरमधील एक समाज किती दिवस राक्षसी प्रवृत्तीच्या आणि जिहादींच्या अत्याचाराला सहन करत बसेल. सरकारने या जिहादी विषवल्लीचे मूळ शोधून वेळीच ठेचावे, अशी मागणी 'आयआयटी बी फॉर भारत' केली आहे.