जागतिक महासागर दिवस २०२२ : जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2022   
Total Views |
ocean


मुंबई(प्रतिनिधी): दरवर्षी ८ जून रोजी आपण महासागरात राहणारे प्राणी आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक महासागर दिन साजरा करतो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार हे महासागर पृथ्वीच्या ५० टक्के 'ऑक्सिजन'चे उत्पादन करते. त्याचबरोबर जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील निर्णायक आहे.
 
 
 
आणि अंदाजे ४० दशलक्ष लोक २०३० पर्यंत महासागर-आधारित उद्योगांमध्ये कार्यरत असतील. सगळ्या सजीवांचे अस्तित्वात महासागर खूप मोठी भूमिका बजावतात. पण, मानवाच्या कृतींमुळे मोठ्या माशांच्या ९० टक्के लोकसंख्येचा ऱ्हास झाला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात सुचवले आहे. मानवाने महासागरातून कधीही भरून काढता येण्यापेक्षा जास्त काही घेतले आहे.
 
 
 
जागतिक महासागर दिवस 2022: इतिहास
 
जागतिक महासागर दिवस दरवर्षी ८ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २००८ मध्ये आपला जगाचा सामायिक महासागर आणि समुद्राशी असलेला आपला वैयक्तिक संबंध साजरा करण्यासाठी 8 जून हा दिवस 'जागतिक महासागर दिवस' म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. समुद्र आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि लोक त्याचे संरक्षण करू शकतील अशा महत्त्वाच्या मार्गांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील गरजेचे आहे.
 
 
 
जागतिक महासागर दिवस 2022: थीम
  
2022 ची जागतिक महासागर दिनाची थीम आहे पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती: "समुदाय, कल्पना आणि उपायांवर प्रकाश टाकणे जे महासागराचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. आणि ते टिकून राहतात."
 
 
मुंबईच्या किनारी दिसणारे: मुंबईकर 'बॉम्बेयाना'
 
slug
(छायाचित्र: प्रथमेश खेडवान)
 
 
१९४६ साली अभ्यासक विकवर्थ यांनी मुंबईतून 'Goniobranchus bombayanus' समुद्री गोगलगायीचा शोध लावला. मुंबईत सापडल्याने तिचे नामकरण 'बॉम्बेयाना' असे करण्यात आले. 'बॉम्बेयाना' समुद्री गोगलगायीची ही प्रजात खडकाळ समुद्रकिनाऱ्यांलगत आढळते. तिचा मूळ रंग पिवळट पांढरा असून त्यावर चकाकी असते. आकाराने साधारण १६ मि.मी. असते.शरीराची कडा आकर्षक केशरी असून शरीरावर जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. श्वसनेंद्रियांवर चंदेरी ठिपके असतात. मृदू शरीर, आकर्षक रंग आणि शोभिवंत दिसते. 'बॉम्बेयाना' मुंबईबरोबरच रत्नागिटी आणि गुजरातच्या किनाऱ्यांवरही आढळते.
@@AUTHORINFO_V1@@