मुंबई: राष्ट्रवादीतून आयात केलेले सचिन अहिर यांना मिळणार शिवसेने तर्फे विधान परिषदेत जाण्याची संधी. सचिन अहिर यांना मुख्यमंत्र्यानी भेटीसाठी वर्ष बंगल्यावर बोलवले आहे. १९९९ साली विधानसभेवर निवडून गेलेले सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या विशेष मर्जीतले व मुंबई राष्ट्रवादीचा चेहेरा म्हणून ओळखले जायच. मंत्रिपदी असताना अहिर यांनी सत्ता आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर शिवसैनिकांना चिरडण्याचे आणि खोट्या तक्रारींमध्ये फसवण्याची षड्यंत्र केले, अशी शिवसेनेत कुजबुज आहे.
२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला. परंतु वरळी विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्या पुढे प्रतिस्पर्ध्यांचे नामोनिशाण राहू नये, यासाठीच २०१४ नंतर राजकीय विजनवासात गेलेल्या अहीर यांचा शिवसेना प्रवेश करण्यात आला. अखेर आज सचिन अहिर यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.