जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर नुपूर शर्मा यांना पोलिस सुरक्षा

    07-Jun-2022
Total Views |

nupur sharma
 
 
 
 
 
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांना त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर त्यांनी मोहंमद पैगंबर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षाने निलंबित केले आहे.
 
 
 
शर्मा यांनी आपले वक्तव्य मागेही घेतले आहे. मात्र, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्याविरोधात शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रारदेखील केली होती. त्यानंतक त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात असून नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतल्याचे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.