मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस!

    07-Jun-2022
Total Views |

notice
 
 
औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवार, दि. ८ जून रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या मैदानातच मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या सभेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही संभाजीनगर पोलिसांकडून काही अटी-शर्तीं घालण्यात आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संभाजीनगर पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे मंगळवारी (दि. ७ जून) उघड झाले आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नावरून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरु आहे. यासंदर्भात बॅनरबाजी केल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन न करण्याबाबत या नोटीसमध्ये म्हटले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवलं जाईल. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे.