१५० वर्षांचा इतिहास असणार्‍या मरोळ मच्छीबाजाराची दुरवस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

aaditya thakre.png
 
 
 
 
 
मुंबई : “साधारण १५० वर्षांचा कोळी महिलांचा मच्छीव्यवसाय आणि जिद्दीचा इतिहास सांगणार्‍या मरोळ मच्छीमार्केटकडे मुंबई महानगरपालिकेने गेल्या १५ ते २० वर्षात ‘सपशेल’ दुर्लक्ष केले आहे. यामुळे येथे सुक्या मच्छीचा व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांना मूलभूत सोईसुविधांसाठी महापालिकेशी संघर्ष करावा लागतो आहे. आदित्यसाहेब, आपल्या आजोबांनी आम्हा कोळीबांधवांवर खूप प्रेम केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्केटच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यामुळे तुमचेही आम्हा कोळी बांधवांप्रति प्रेम असेल, तर आमच्या समस्या सोडवा,” असे आवाहनही मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिलेच्या संस्थापिका अध्यक्ष राजश्री भानजी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना केले.
 
 
 
मच्छीबाजारात स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. २००७ साली याच महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून पक्के छप्पर, मासळी विकायला आर. सी. सी. कट्टे, वीजबत्ती, शौचालये आदी सोईसुविधा कोळी महिलांसाठी उभारण्यात आल्या. मात्र, कालांतराने पालिकेच्या माध्यमातून कोणतेही सहकार्य किंवा दुरुस्ती न झाल्याने आज हे मार्केट मरणासन्न अवस्थेत आहे. मात्र, मच्छीविक्रेता महिला संघटनेने या मार्केटच्या दुरुस्तीसाठी लढा सुरू केला आहे. याबाबत बोलताना राजश्री भानजी म्हणतात की, “पाच हजार महिला माझ्यासोबत आहेत. पालिकेने काही वर्षांपूर्वी दीड कोटींचा निधी मजूर केला या बाजाराच्या दुरुस्तीसाठी केवळ ६८ लाखांत काही काम झाली. तीही निकृष्ट दर्जाची झाली. आम्ही कितीतरी पत्रव्यवहार केले. आता पावसाळा आला आहे.
 
 
 
आमची सर्व सुकी मच्छी खराब होते. त्यामुळे आता आम्हाला नवीन मार्केट पालिकेने बांधून द्यावे. इथे काहीही सोय नाही. इथे सर्वत्र चिखल असतो. पालिकेला कळले पाहिजे की, खायचे पदार्थ आम्ही असे कसे विकणार? ही आमची मुंबई आहे. आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावेच लागणार. आमची मुंबई अशीच विकू देणार नाही. आम्ही मुंबईतील सर्व मच्छीमार्केट आमच्या हक्काची आहेत, त्याला आम्ही हात लावू देणार नाही.” मच्छीविक्रेत्या महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “१२ ते १५ वर्षांपासून मी इथे मच्छीविक्रीचा व्यवसाय करते आहे. इथे खूप अस्वच्छता आहे. किती वर्षांपासून हे घनकचरा प्रकल्पाचे डब्बे आणून ठेवले आहेत. काहीही कारण नसताना केवळ आणून टाकले आहेत. इथे त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. रात्री नशा करणारे लोक, गर्दुल्ले त्याच्यामागे येऊन बसतात. आम्हा महिलांना दारू पिऊन त्रास देतात. आम्ही पोलिसांकडे गेलो. ते आम्हाला पालिकेकडे पाठवतात. पालिकेशी इतके पत्रव्यवहार झाले. पण त्याला कोणतेही उत्तर आले नाही.”
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@