कनैह्यालालच्या मदतीसाठी भाजपच्या कपिल मिश्रा यांच्याकडून १ कोटी

    30-Jun-2022
Total Views |
 
kapil
 
 
 
 
उदयपूर: नुपूर शर्मा यांचे सोशलमीडियावर समर्थन केल्याने उदयपूरमधील टेलर कन्हैय्यालाल यांची हत्या झाली होती, याच कनैह्यालाल यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भाजपचे राजस्थानमधील नेते कपिल मिश्रा पुढे सरसावले असून त्यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल १ कोटींची मदत त्यांना जमा करता आली आहे. अवघ्या २४ तासांत ही मदत जमा झाली आहे.
 
 
 
 
 
 
नुपूर शर्मा यांचे सोशल मीडियावरून समर्थन केल्यामुळे कन्हैय्यालाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या ईश्वरसिंग हेही या हल्ल्यात जखमी झाले होते. ईश्वरसिंग यांनाही २५ लाखांची मदत कपिल मिश्रा यांनी जाहीर केली आहे. भारतीयांच्या दातृत्त्वाने भारावून गेलो असून मी भारतीयांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया कपिल मिश्रा यांनी दिली आहे.