आम्ही उमेदवार मागे घेणार नाही : आ. चंद्रकांत पाटील

    03-Jun-2022
Total Views |
 
chandrakant
 
 
 
 

मुंबई : "आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा उमेदवार मागे घेणार नाही" असा ठाम निर्धार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या ठाम निर्धाराने भाजपने महाविकास आघाडीकडून आलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपकडे आपला उमेदवार मागे घ्यावा आणि विधानपरिषद निवडणुकीत एक जास्त जागा भाजपला देण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राज्यसभा निवडणूक होऊ न देता ते बिनविरोध व्हावी अशी महाविकास आघाडीची अपेक्षा होती पण भाजपने ही अपेक्षा फोल ठरवली आहे.
 
 
 
"गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा आहे की राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होते, पण जेव्हा जेव्हा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे तेव्हा तेव्हा ती तर्काच्या आधारे बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध होणे हे चुकीचे ठरेल" असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आताची राज्यसभा निवडणूक भाजपसाठी सोडा भाजप विधानपरिषद महाविकास आघाडीला सोडेल असा उलट प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक होणारच हे आता स्पष्ट आहे.