वाचन आणि नाटक यामधली पायरी म्हणजे अभिवाचन!
या आधी अलिबाग मध्ये अभिवाचनाचे पाच कार्यक्रम झाले, आणि त्या कार्यक्रमांना आनंद देणारा प्रेक्षक वर्ग देखील लाभला.
आता वेळ आहे आपल्या सहाव्या पुष्पाला भेट देण्याची....
आत्ता चं पुष्प थोडं खास आहे, कारण ते आहे आपल्या बालमित्रांसाठी...
चेंढरे ग्रामपंचायत सभागृह येथे दिनांक ३ जून ते ५ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वा.
चला मग , भेटूया, वाचूया, ऐकूया!!!
अभिवाचन अलिबाग मध्ये सुरू करण्यापाठी शुद्ध भावना होती,आहे आणि राहील ती म्हणजे, वाचन वाढावं, नाटकाची बीज रुजायला मदत व्हावी, आणि एकत्र येऊन फलदायी घडावं.
आनंदी आहोतच, आता वाचनातून समाधान शोधुया!