मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतानाच त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा काळ पूर्ण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. ठाकरे सरकार अर्थात शरद पवार यांनी स्थापन केलेलं अनैसर्गिक आघाडीचं सरकार अवघ्या अडीच वर्षांत कोसळलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.