सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हे ब्रीदवाक्य घेऊन समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशचे 19 वे समरसता साहित्य संमेलन दि. 2 आणि 3 जुलै रोजी नागपूरच्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरी’त संपन्न होत आहे. 19व्या साहित्य संमेलनाचा विषय आहे, ’साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’. संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षीय भाषणाला फार मोठे महत्त्व आहे. संमेलनाच्या अध्यक्षांच्या भोवती संमेलन केंद्रित झालेले असते. 19व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत, साहित्यिक समीक्षक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे आणि संमेलनाचा विषय आहे, ’साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि समरसता‘. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संमेलनाचा हा विषय समरसता साहित्य परिषदेत घेतला आहे.
‘सूक्तसंदर्भ’, ‘गोविंदाग्रज समीक्षा’, ‘कविता कुसुमग्रजांची’, ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’, ‘मर्ढेकरांची कविता आकलन, आस्वाद आणि चिकित्सा’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : व्यक्ती आणि वाड्.मय’, ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा 527 पृष्ठांचा ग्रंथ डॉ. काळेंचा ग्रंथ काव्यभिरुचीचे आणि समीक्षासामर्थ्याचे वेगळेपण स्पष्ट करणारा आहे. संमेलनात काही परिसंवांदाचे आयोजन करण्यात आले असून ‘अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’, ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील प्रादेशिकता’, ’अण्णा भाऊंचे साहित्य विश्व’, ‘काव्यप्रवाहातील समरसता’, ‘नव्वदोत्तर साहित्यातील समरसता’, ‘साहित्यातील विविध साहित्यप्रवाह आणि समरसता’, ‘काव्य आणि शाहिरी राष्ट्रीय जाणिवा’, ‘कथात्म साहित्य आणि समरसता’, ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’, ‘अण्णा भाऊंचे साहित्य आणि गावगाडा’, अशा चिंतनशील विषयांवर अनेक मान्यवर परिसंवादात सहभागी होणार आहे. ग्रंथदिंडी ग्रंथप्रदर्शन, समरसता रंगावली प्रदर्शन, कवी संमेलन, समरसता संगीत रजनी यांसारख्या भरगच्च कार्यक्रमांची आखणी संमेलनात करण्यात आली आहे. संमेलनाच्या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटक आहेत माजी खासदार, ‘पांचजन्य’चे माजी संपादक तरुण विजय स्वागताध्यक्ष आहेत. माजी खासदार दत्ताजी मेघे, त्याचबरोबर ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. प्रसन्न पाटील इ. मान्यवरांच्या उपस्थितीत समरसतेचा जागर समरसततेच्या साहित्य संमेलनात होईल.
-नंदकुमार राऊत