मुंबई : मुंबईमध्ये विधानभवनात गुरुवारी बहुमत चाचणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई मध्ये एक जबाबदार पोलीस आयुक्ताची गरज लक्षात घेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आय. पी. एस. अधिकारी आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त्तपदी असलेले संजय पांडे यांच्या जागेवर आता फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी, ३० जून ला संजय पांडे यांचा कार्यभार संपेल.
विवेक फणसाळकर यांना मुंबईच्या चांगला अनुभव असून, ते मुंबईच्या वाहतूक पोलीस सहाय्यक आयुक्त देखील होते. तसेच ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना विवेक फणसाळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची मे २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. फणसाळकर यांना मुंबई मध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आज ३० जून रोजी निवृत्त होणार आहे. उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झालेत. पोलिसांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे दोन हजार सीआरपीएफचे जवान तीन विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसाळकर याच्या नावाला मंजुरी दिली आहे.