हा तर बाळासाहेबांच्या विचारांचा विजय : एकनाथ शिंदे

    27-Jun-2022
Total Views |
 
 
mva
 
 
 
 
 
गुवाहाटी : "सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय" असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनीच वागत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान शिवसेनेने अनैसर्गिक महाविकास आघाडी मधून बाहेर पडून भाजपशी युती करावी अशी मागणीही शिंदे गटाकडून केली जात आहे.
 
 
 
 
  
 
 
 
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . त्यावर सोमवार दि. २७ जून रोजी सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने उपाध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देत १२ जुलै पर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करत येणार नाही असा आदेश दिला आहे. या प्रकारणाची पुढील सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे.