मुंबई : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी शिंदेगटातील पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय सोमवारी (दि. २७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर नेत्यांच्या खात्यांसंदर्भात त्वरीत निर्णय घेतला मात्र कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी थेट संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या खात्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे 'सैनिकांची खाती काढली पण मलिकांची नबाबशाही सुरूच', असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
"मुख्यमंत्री म्हणून अजूनही पदाला चिकटून असलेले शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपात मोठे फेरबदल केले आहेत. तुरुंगात असलेले नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आला नाही. सैनिकांची खाती काढली पण मलिकांची नबाबशाही सुरूच.", असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवल्याचे दिसते.