मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण - नाना पटोले

    22-Jun-2022
Total Views |
y
 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. हे बंड मोडून काढणे अवघड असल्याने शिंदे यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'आरटीपीसीआर' चाचणी निगेटिव्ह आली आहे तर 'अँटीजेन' चाचणी पॉजिटीव्ह आलेली आहे.
 
 
विधानसभा निवडणूक व त्यानंतर शिंदेंचं नाराजी नाट्य यामुळे मुख्यमंत्री अनेकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. त्यातून मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संजय राऊतांचे विधानसभा बरखास्त होण्याबाबदचे ट्विट आणि त्यांनतर मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी बाहेर आल्याने, हा योगायोग असावा कि आणखीन काही?  अशा पद्धतीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत सर्व आलबेल असल्याची प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्रात सरकार अस्थिर नाही असे पुन्हा एकदा सांगितले आहे. परंतु शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने" या ट्विटवर पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. त्यात मुख्यमंत्र्यांची 'आरटीपीसीआर' चाचणी निगेटिव्ह आणि 'अँटीजेन' चाचणी पॉजिटीव्ह आलेली आहे, या बातमीने राजकीय गोंधळात अधिकची भर पडलेली आहे.