शेवटी आपण दोघेच राहणार तर नाही ना!

मनसे नेते गजानन काळेंचा शिवसेनेला टोला

    22-Jun-2022
Total Views |
y
 
 
 
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांकडून शिवसेनेला ट्रॉल करण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव गजानन काळे यांचं एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये "शेवटी आपण दोघेच राहणार तर नाही ना" असा टोला लगावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या दोघांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे हे जमिनीकडे एकटक बघत आहेत तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला आहे.
 
 
स्वपक्षीय व अपक्ष मिळून ४० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिलेले आहे. यापूर्वी अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले आहेत परंतु शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक नगरसेवकांचा देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचे बोलले जाते. एकूण ५५ आमदारांची संख्या असलेल्या शिवसेनेकडे सध्या केवळ १५ आमदार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एरव्ही मनसेला ट्रॉल करणाऱ्या शिवसेनेला गजानन काळे यांनी जश्यास तसे उत्तर दिले आहे.