मुंबई: राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. राज्यसभा निवडणूकित सहाव्या जागेवरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले होते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरु करावी अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
"येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधानपरिषद निवडणुकीत दिसणार आहे." असे म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांच्या वाढलेल्या वजनावरुन बच्चू कडू यांनी टोलेबाजी केली.