पुण्याच्या पर्यावरण आराखड्यासाठी 'ग्लोबल कोव्हेटेंट ऑफ मेयर्स' सहकार्य करणार

    02-Jun-2022
Total Views |

Pune
 
 
पुणे: पुणे महानगराचा पर्यावरण कृती आराखडा बनविण्यासाठी युरोपियन समुदायानतर्गत असलेल्या ग्लोबल कोव्हेटंट ऑफ मेयर्स या संस्थेने पुणे महापालिकेला मदतीची तयारी दर्शविली आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले की, या अंतर्गत पुणे महापालिकेच्या संबंधित प्रकल्पांची जलदगतीने अमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कृतीचा समावेश असणारा सर्वसमावेशक हवामान कृती नियोजन अभ्यास केला जाणार आहे.
 
 
 
या समुदायाच्या सदस्यांनी महापालिकेला भेट दिल्यानंतर सांगितले की, पर्यावरणाचा कृती आराखडा करण्याबरोबरच बदलत्या वातावरणाचा परिणाम याची माहिती आणि त्यासाठी आवश्यक उपायोजनाचा अभ्यास या अंतर्गत केला जाणार आहे. आपत्ती प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या गरजा व तेथील परिस्थिती याचा अभ्यास करण्यावर भर दिला जाणार आहे.कमी कार्बन उत्सर्णाचे उद्दिष्ट देखील साध्य करण्यात येणार असल्याच्या माहिती या संस्थेचे प्रमुख असिह बुदिआती यांनी दिली.