नवी दिल्ली: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक मेट्रिक टन आंब्याची भेट पाठवली आहे. पूर्वीची परंपरा पुढे सुरु ठेवत आम्रपाली जातीच्या आंब्यांची भेट पाठवली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेट म्हणून २६०० किलो आंबे पाठवले होते.
'मँगो डिप्लोमसी' :
आशिया खंडातील 'मँगो डिप्लोमसी' हा एक राजकारणाचा भाग आहे. पूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये आंबे पाठवले जात असत. पाकिस्तानचे माजी हुकूमशहा झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांनी भारताला आंबे भेट म्हणून पाठवले होते. बांग्लादेशकडून २०२० मध्ये दुर्गा पूजेच्या निमित्ताने व्यापाऱ्यांना हिल्सा मासे निर्यात केले. बांगलादेशने १५०० टन हिल्सा मासे भारतात पाठवण्यासाठी विशेष परवानगी घेतली होती.