विमान तिकीट प्रवास महागणार!

    17-Jun-2022
Total Views |
 
 
airlines
 
 
 
 
नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीत १६.% ने वाढ केल्यामुळे, दिल्लीमध्ये जेट इंधनाच्या किमती प्रति किलोलिटर १.४१ लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एटीएफच्या किमतींमध्ये झालेली विक्रमी वाढ, घसरत चाललेल्या रुपयासह, एअरलाइन्सच्या ऑपरेशन्सच्या खर्चात वाढ, आणि अनेक कारणांमुळे, हवाई तिकिटांची किंमत १५% ने वाढू शकते.
 
 
ग्राहकांवर काय होईल परिणाम?
 
 
उड्डाण करणे अधिक महाग होणार आहे. स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना एटीएफच्या किमतीतील वाढ विमान कंपन्यांना द्यावे लागेल ज्याकारणाने तिकिटाच्या किमती १५% ने वाढतील. उद्योग निरीक्षकांच्या मते ते आणखी जास्त असू शकते, परंतु एअरलाइन्समधील स्पर्धेच्या पातळीवर बरेच काही अवलंबून असेल.
 
 
आणि विमान वाहतूक उद्योगावर काय परिणाम होईल?
 
 
महामारीनंतर, विमानात प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. आरामदायी प्रवासाच्या मोठ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रवासाची मागणी वाढल्यामुळे आणखी वाढ होत आहे. प्रवास उद्योग क्षेत्त्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत किंमती सुमारे ५०% जास्त आहे. भाड्यातील कोणतीही वाढ प्रवाशांच्या मागणीवर परिणाम करते कारण लोक प्रवासासाठी पर्यायी मार्ग निवडतात जसे की ट्रेन आणि रस्ते, जे विमान कंपन्यांपेक्षा खूपच स्वस्त आहेत.