नवी दिल्ली: भारतीय हवाई दलासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. २००७ साली, हवाई दलातील लढाऊ विमानांची कमी होत असलेली संख्या वाढवण्यासाठी, १२६ आधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता भारतीय वायू सेनेसाठी ११४ लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. पण, त्यापैकी केवळ १८ विमाने तयार स्थितीत खरेदी केली जातील. ही विमाने ९६ परदेशी कंपनीच्या मदतीने भारतात तयार केली जातील.
आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक मोठे पाऊल
ही लढाऊ विमाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. बाय ग्लोबल आणि मेक इन इंडिया योजनेअंतर्गत यापैकी ९६ जेट भारतीय कंपन्या बनवणार आहेत. तयार झालेल्या १८ विमाने आल्यानंतर, पुढील ३६ विमाने भारतीय कंपन्या बनवतील. त्यातील काही विदेशी चलनात तर काही भारतीय चलनात दिली जातील. उर्वरित ६० जेट विमाने भारतात बनवली जातील आणि त्याचे संपूर्ण पेमेंट भारतीय चलनातच केले जाईल. बोईंग, लॉकहीड मार्टिन, साब, मिग, दसने यासारख्या जगातील सर्व बड्या विमान उत्पादक कंपन्या या मोठ्या करारासाठी आपला दावा मांडतील अशी शक्यता आहे.