माणसाच्या निरोगी मनाचे गुण अभ्यासल्यानंतर आपल्याला कळून येते की, जेव्हा बाहेरील किंवा अंतर्गत बदलांमुळे जेव्हा अडथळा निर्माण होतो व शरीर व मनातील अंतर्गत शांतता व सुव्यवस्था भंग पावते, त्यावेळी माणसाची सहजता निघून जाते व तो आजारी पडतो, त्याची द्विधा मनस्थिती होते. मनाचा गोंधळ उडतो. विसरभोळेपणा वाढतो. आजूबाजूला घडणार्या गोष्टींचा सारासार विचार त्यास जमत नाही. तरतमभाव व सदसद्विवेकबुद्धी कार्य करत नाही व याचा परिणाम हा आजार होण्यात दिसून येतो.
निरोगी मन हे नेहमी संतुलित विचारांचे असते व त्याच संतुलितपणे ते आजूबाजूला घडणार्या घटनांचा अभ्यास करून त्याप्रमाणे प्रतिक्रिया देत असते. आयुष्यात एक प्रकारचा सकारात्मक विचार ठेवून मन कुठल्याही प्रसंगाला तोंड देता येते.
मनाचा आनंद, प्रेम, इतरांबद्दल वाटणारी काळजी, कणव, विश्वास, समाधान, धन्यता, सकारात्मक सक्रियता इत्यादी गुण माणसाचे निरोगी असणे दाखवतात. जेव्हा एखादी दुःखद गोष्ट किंवा घटना घडते, तेव्हा निरोगी माणसालाही दुःख होते, उदासिनता येते, वाईट वाटते, तसेच जर काही चुकीचे घडत असेल, तर त्याचा रागही येतो व चीडचीडसुद्धा होते. हे सर्व स्वाभाविक व ‘नॉर्मल’ आहे. पण, निरोगी माणूस या सर्व भावना जोपासत बसत नाही. या भावना व प्रतिक्रिया या तात्पुरत्या असतात, कायम स्वरुपात राहणार्या असतात. जेव्हा या भावना कायमस्वरूपात जोपासल्या जातात, तेव्हा त्याला आपण मनाची असहजता व आजारपणाची सुरुवात असे म्हणतो. सतत एखाद्या गोष्टीवर कुढत बसणे व सतत नकारात्मक विचार करणे, हे आजारीपणाचे लक्षण मानले जाते.
सतत एखादी गोष्ट मनात ठेवून विचार करणे (Brooding over imaginary troubles) किंवा एखाद्या छोट्याशा कारणावरुन किंवा काहीही कारण नसताना चिडणे, रागावणे, तसेच दुःखी होणे, रडत बसणे, एकटेपणा वाटणे, अतिप्रमाणात बोलणे (Loquacity), संशयी वृत्ती, खोटे बोलणे, अतिप्रमाणात भावनांचा उद्रेक, अति हसणे, अविश्वास दाखवणे, मत्सर करणे, इतरांच्या बद्दल सुडाची भावना ठेवणे, क्रूरता हे सर्व नकारात्मक विचार व मानसिक संतुलन बिघडून जाते व माणूस आजारी पडतो. थोडक्यात काय, तर माणसाची चैतन्यशक्ती व मन निरोगी राहिले पाहिजे व त्यासाठी सर्वात उपयुक्त म्हणजे होमियोपॅथीची औषधप्रणाली होय.
this bodily appearance
is not all;
The from deceives
the person is a mask ;
Hid deep in man celestial
powers can dwell
His fragile ship conveys
through the sea of years
an incognito of the
Imperishable
A spirit that is a flame
of God abides,
A fiery portion of the Wonderful,
Artist of his own beauty
and delight,
Immortal in our mortal poverty.
वरील कवितेत मानवाच्या बदलत्या स्थितीचे वर्णन आहे. पुढे आपण या बदलत्या स्थितीचा म्हणजेच (Diseases store) रोगाचा अभ्यास आपण करणार आहोत.
- डॉ. मंदार पाटकर