आल्हादायक! मान्सून पोहोचला वेंगुर्ल्यात..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2022   
Total Views |
kokan 
 
मुंबई(प्रतिनिधी): येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असे वृत्त काल भारतीय हवामान विभागाने दिले होते. परंतु २४ तासातच मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज दि. १० रोजी नैऋत्य मोसमी पाऊस गोवा, कर्नाटक आणि कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पुढे सरकला आहे.
नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
मान्सून लवकर येणार असा अंदाज होता, परंतु काही वातावरणीय घडमोडींमुळे त्याचा प्रवास खुंटला होता. परंतु आता मान्सून वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला असून, लवकरच मुंबईच्या दिशेने वाटचाल करेल. महाराष्ट्रात, जून-सप्टेंबर या हंगामात, 'दीर्घ कालावधीच्या सरासरी'च्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्य भारत, गंगेच्या पश्चिम बंगाल, गोवा आणि कोकणातील काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@