औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्या एमआयएमचा ठाकरे सरकारला पाठिंबा

    10-Jun-2022
Total Views |
 rt
 
 
 
 
मुंबई: एमआयएमचे आमदार राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आहे. हॉटेल ट्रायडेंट येथे शिवसेनेचे वरिष्ठ नेते व खासदार इम्तियाज जलिल यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी ट्विट करून जलील यांनी ही माहिती दिली. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मतदनं करणार आहोत. मात्र त्यांचे आणि आमचे राजकीय आणि वैचारीक मतभेद कायम राहतील असे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
 
 
 
शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करणाऱ्या औरंगजेब याच्या कबरीवर चादर चढववणारे एमआयएमचे आमदार, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर करू अशा वल्गना करणाऱ्या शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाविकास आघाडी सरकारला, राज्यजभेच्या निवडणुकीत मतदान करणार आहे. कालपर्यंत तठस्थ असलेली एमआयएम आज महाविकास आघाडी सोबत असल्याचे स्पष्ट झाले.
 
 
 
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. आपल्या एकाही आमदारांचे मत घटू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे २८८ सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि २ आमदार कोठडीत असल्याने एकूण २८५ मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे अपक्ष आमदार व छोट्या पक्षाच्या आमदारांना गाळाला लावण्यासाठी सर्व पक्षांची रस्सी खेच सुरु आहे.