ठाकरे सरकारचा पाय खोलात, सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार

    01-Jun-2022
Total Views |
 
sachin
 
 
 
 
मुंबई : ठाकरे सरकारच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला आता माफीचा साक्षीदार होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबरीने या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे सहआरोपी आहे. सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार होण्याला हरकत घेणारी कुंदन शिंदेंची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज मंजूर केला आहे. आता ७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत वाझेच्या या सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जाईल.
 
 
 
 
ठाकरे सरकारच्या खंडणी प्रकरणाचे सर्व धागेदोरे आता उकलले जातील. वाझे माफीचा साक्षीदार बनल्यामुळे आता अनिल देशमुखांच्या सर्व काळ्या कृत्यांचे सत्य जगासमोर येईल. वाझे हा खंडणी प्रकारणाबरोबर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्याही हत्येतील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. आता या सर्व प्रकरणांची पाळेमुळे खणली जाऊन सर्वच प्रकरणातील सत्यता बाहेर येईल आणि ठाकरे सरकारचे सत्य चव्हाट्यावर येईल.