उद्धव ठाकरे माझा आवाज बंद करू शकत नाहीत - मोहित कंबोज

    01-Jun-2022
Total Views |
 
mohit
 
 
 
 
 
मुंबई : "माझ्याविरोधातली जुनी प्रकरणे बाहेर काढून , गुन्हे दाखल करून महाविकास आघाडी माझा आवाज बंद करू शकत नाही" असा  इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिला आहे. महाविकास आघडीने कितीही प्रयत्न केले तरी माझी तुमच्याविरोधातली लढाई चालूच राहील असा थेट इशारा कंबोज यांनी दिला आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे गैव्यवहार बाहेर आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मोहित कंबोज यांच्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून घेतलेल्या ५२ कोटींच्या कर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप कंबोज यांच्यावर आहे. २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीसाठी कंबोज यांनी हे कर्ज घेतले होते. या प्रकरणी मोहित कंबोज आणि त्यांचा कंपनीच्या २ संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंबोज यांनी याविरोधात ट्विट करून हेसर्व आरोप फेटाळून लावले आहेत.