सुप्रसिद्ध गायक केके याचा मृत्यू 'अनैसर्गिक?'

    01-Jun-2022
Total Views |


kk
 
 
 
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके याचे ३१ मी २०२२ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले, असे सांगण्यात येत आहे. परंतु, आता जे रिपोर्ट्स समोर येत आहेत त्यात म्हटले आहे की, केकेच्या चेहेऱ्यावर आणि डोक्यावर जखम झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी हा मृत्यू 'अनैसर्गिक' आहे, असे नोंदवले आहे. कोलकाताच्या SSKM रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात येणार आहे.
 
 
 
 
केकेच्या चेहेऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा सापडल्यानंतर कोलकाता पोलिसांनी तो ज्या ठिकाणी राहायला होता त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. केके दोन दिवस इथे वास्तव्यास होता. त्या आधी त्याचा पुणे येथे गाण्याची कॉन्सर्ट होती. केकेचे कोलकाता मधील दोन कॉलेज फेस्टिवल्स मध्ये कार्यक्रम होते. त्याच्या मृत्यूचे कारण सुरुवातीस 'कार्डियाक अरेस्ट' आहे असे सांगण्यात येत होते, परंतु, आता डॉक्टर्स उत्तर देणे टाळत आहेत. हा केके कोणत्याही व्यसनापासूनही दूर होता, त्यामुळे आता त्याच्या निधनाचे नक्की कारण काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
 
 
केके चे कुटुंब आता कोलकाता येथे पोहचले आहे. एसएसकेएम रुग्णालयातून त्याच्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण काय हे स्पष्ट होईल.