लवकरच प्रदर्शित होणार 'ब्रह्मास्त्र' चा ट्रेलर

    31-May-2022
Total Views |
 
 
 
ब्रह्मास्त्र
 
 
 
मुंबई : नुकत्याच लग्नाच्या बंधनात अडकलेले अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर सध्या विशाखापट्टणमला सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. या दरम्यान सिनेमाचा नवा टीझर रिलीज झाला. आता सिनेमाचा ट्रेलर १५ जूनला प्रदर्शित होणार असल्याची माहिती अयान मुखर्जी यांनी दिली.
 
 
 
अयान मुखर्जी याने पाच वर्षापूर्वी दिग्दर्शक म्हणून 'ब्रह्मास्त्र'च्या शूटला सुरुवात केली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा चित्रपट रखडला होता. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. हा चित्रपट रणबीर आणि आलियासाठी खूप खास आहे, कारण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. आता नुकतीच दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या चित्रपटातील एका गाण्याची फक्त झलकच दाखविण्यात आली आहे त्यामुळे सर्वच चाहते त्यांच्या गाण्याची देखील खूप आतुरतेने वाट बघत आहेत.