पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील ३० बालकांना साह्य

    30-May-2022
Total Views |
 
 
pm cares fund thane
 
 
 
 
ठाणे :  पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लाभ (दस्तऐवज) वितरण करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे ३० अनाथ बालके यावेळी उपस्थित होती. त्यांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याहस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
 
 
 
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांची एकुण संख्या ४३ आहे.त्यातील ३० जण सोमवारी उपस्थित होते.उर्वरीत बालकांच्या सांभाळकर्त्यांकडे हे साहय सोपवण्यात आले.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी बालकांना 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या मात्र शिक्षण ऑनलाईन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही आहोत, असा दिलासाही नार्वेकर यांनी दिला.