अहमदाबाद : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (२९ मे रोजी) आयपीएल २०२२ चा समारोप झाला. यावेळी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता १ लाख ३० हजार होती. स्टेडियममध्ये उपस्थित १ लाखपेक्षा जास्त प्रेक्षकांनी ‘वंदे मातरम्’ चे सामुहिक गायन केले. १ लाख लोकांनी सामूहिक 'वंदे मातरम्' गाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
अंतिम सामना गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झाला. एआर रहमान आणि रणवीर सिंग हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एआर रहमान यांच्यासोबत एक लाखांहून अधिक लोकांनी 'वंदे मातरम्' गीत गायले.