डॉ. अनिल बोंडेंना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी

    30-May-2022
Total Views |

bonde
 
मुंबई : भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना भाजपाने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल डॉ. अनिल बोंडे यांनी भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचे आभार मानले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन सन्मान दिला, त्याबद्दल मी आभारी आहे." असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
 
मोदी सरकारच्या सर्व योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार असंही ते म्हणाले. औद्योगिकरण, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
 
डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षातून कारकीर्द सुरू केली होती. मध्यंतरी त्यांनी स्वत:चा पक्षही काढला होता. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विदर्भातून कुणबी, मराठा समाजात जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपामध्ये सुरू झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बोंडे यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.