देशातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

देशात आणखी ८ प्लांट उभारणार: नरेंद्र मोदी

    29-May-2022
Total Views |
 
 
pm modi
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. २८ मे रोजी गुजरातच्या दौर्‍यावर होते आणि निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदींनी राजकोट येथील अटकोट येथे नव्याने बांधलेल्या मातुश्रीच्या डीपी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले.
 
 
राजकोटमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मला डोके टेकवून गुजरातमधील सर्व नागरिकांचा आदर करायचा आहे. तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळे आणि शिक्षणामुळे मी मातृभूमीच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही, समाजासाठी कसे जगायचे हे शिकवले. मी कुणाचेही डोके झुकू दिले नाही.”
 
 
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायंकाळी कलोलमध्ये देशातील पहिल्या नॅनो युरिया (लिक्विड) प्लांटचे उद्घाटन केले. ”नॅनो युरियाची सुमारे अर्धा लीटर बाटली, शेतकर्‍यांची एक पोती युरियाची गरज पूर्ण करेल. येत्या काळात असे आणखी आठ प्लांट उभारले जाणार आहेत,” असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.