नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दिल्लीतील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवून चार वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणाचा तपास करणार्या ‘सीबीआय’ने २६ मार्च, २०१० रोजी चौटाला यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सात वेळा आमदार राहिलेल्या चौटालांनी ६.०९ कोटींची बेहिशोबी संपत्ती कमावल्याचा आरोप ‘सीबीआय’ने केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ‘ईडी’ने ‘मनीलॉण्ड्रिंग’ कायद्यान्वये त्यांची मालमत्ता ‘सील’ केली होती.