नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग केस प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. आर्यन खान सोबत अन्य पाच आरोपींची देखील पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ज्यावेळी मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर एनसीबी ने धाड टाकली होती तेव्हा हे प्रकरण सर्वांसमोर आले होते. २ ऑक्टोबर,२०२१ रोजी आर्यन खानला या ड्रग केस प्रकरणात अटक झाली होती आणि लगेचच ३० ऑक्टोबर रोजी त्याची सुटकाही झाली होती. बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने आर्यन ची जामिनावर सुटका केली होती. तर त्याचे वडील शाहरुख खान ने देखील आपल्या मुलाच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी केली होती.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या या बहुचर्चित केस मध्ये २७मे रोजी जवळपास ६००० पानांची चार्जशीट लागू केली आहे. या मध्ये १४ आरोपींविरोधात अनेक कलमे लागू करण्यात आ ली आहेत, परंतु आर्यन खानचे या यादीत कुठेही नाव आढळले नाही. त्यामुळे ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडिया वर या घटनेविरोधात नागरिकांनी चांगलाच जाब विचारला आहे, तर अनेक यूजर्स म्हणतायत ही पैश्यांची कृपा आहे.