सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याबाबत न्यायालयात अर्ज

    27-May-2022
Total Views | 78

sachin vaze
 
 
 
 
 
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अ‍ॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सचिन वाझेने विशेष ‘सीबीआय’न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ‘सीबीआय’नेत्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून, येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेने दाखवली आहे. ’एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सचिन वाझेच्या या अर्जामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
 
 
माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी काही कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारला, तर त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच, इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे सचिन वाझेला खटल्याला सामोरे जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी याआधी फेब्रुवारी महिन्यात ‘ईडी’ला पत्र लिहून अशीच विनंती केली होती. ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणात आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे सचिन वाझेंनी या लेखी पत्रात म्हटले होते. त्यामुळे आता याच प्रकरणात सचिन वाझेंनी ‘कलम ३०६’ अंतर्गत वकील रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जात सचिन वाझेने आपण तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हणले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121