सोयाबीन आणि सूर्यफूल खाद्यतेलावरील आयात शुल्क हटविले; केंद्राचा निर्णय

    26-May-2022
Total Views |

sunflower oil
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : मोदी सरकारने मंगळवारी मार्च २०२४ पर्यंत वार्षिक दोन दशलक्ष टन कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी उपकर काढून टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतील लवकरच घट होण्याची शक्यता आहे.
 
 
 
वित्त मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक दोन दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क लावले जाणार नाही, असे म्हटले आहे. आयात शुल्कातील ही सवलत देशांतर्गत किमती खाली आणेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) ट्विट करून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे म्हटले आहे.
 
 
 
देशात रास्त दरात साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे, हे केंद्राचे पहिले प्राधान्य असून त्यानंतर जास्तीत जास्त साखर ‘इथेनॉल’कडे वळवली जाईल, असे अन्न व सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी सांगितले.