कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बहुमजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा सुरु!

    25-May-2022
Total Views | 339

kalyan
 
 
 
 
 
 
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने धडक तोडक कारवाई सुरू ठेवली असून बुधवारी ह, आय व ई प्रभागात अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.
 
 
 
ह प्रभागातील नवापाडा परिसरात पवन चौधरी यांच्या तळमजला +५ अनधिकृत इमारतीचे २८ स्लॅब तोडून निष्कासनाची कारवाई सहा.आयुक्त अक्षय गुडधे, सुधीर मोकल आणि त्यांच्या पथकाने केली. आय प्रभागातील आडीवली ढोकली येथील घनश्याम जयस्वाल व राजू मिसाळ यांच्या तळमजला +४ अनाधिकृत इमारतीवर तसेच दावडी गोळवली येथील राजन ठाकूर यांच्या तळमजला +७ अनधिकृत इमारतीतील ३४ स्लॅब तोडून सहा.आयुक्त संजय साबळे,हेमा मुंबरकर, किशोर ठाकूर,सुहास गुप्ते यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करत अंदाजे ४५०० फुट बांधकाम निष्कासीत करण्यात आले.
 
 
 
तसेच ई प्रभागात माणगाव डोंबिवली पूर्व येथील राजू वजे यांच्या तळमजला +१ अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर सहा.आयुक्त भारत पवार, सविता हिले, राजेश सावंत यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई बुधवारी सुरु केली आहे. अनधिकृत बांधकामाविरुध्द निष्कासनाची मोठी कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलिसांच्या मदतीने करण्यात येत असून सदर कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121