नवी मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये आता होणार हरित उपक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2022   
Total Views |
SC
 
 
 
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): नवी मुंबई महापालिकेने 'ग्रीन स्कूल' विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता पर्यावरण अभ्यास हा केवळ एक विषय म्हणून शिकवला जाणार नाही. ही कल्पना 'नेदरलँड्स'मधील शाळांच्या संकल्पनेवर आधारित आहे. हा प्रकल्प येत्या नवीन शैक्षणिक वर्षातच जूनपासून चार शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
 
 
 
या दरम्यान विविध उदाहरणाद्वारे पर्यावरणीय सुरक्षा शिकवली जाणार आहे. त्याचबरोबर संरचनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शाळांमध्ये सौरऊर्जा, कंपोस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग आणि कचऱ्याचा पुनर्वापर असे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या उपक्रमाद्वारे मुलांना पर्यावरणपूरक जीवन पद्धतीची ओळख करून देण्याचा उद्देश आहे. पर्यावरणाच्या विविध उपक्रमांचे एकत्रीकरण या निमित्ताने होणार आहे. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव पडेल. पर्यावरण अभ्यास हा विषय न राहता, जीवनशैलीचा एक भाग म्हणून शिकवला जाणार आहे. वर्गांमध्ये सूर्यप्रकाश आणि चांगले 'वेंटिलेशन' सुनिश्चित करण्यासाठी खिडक्यांच्या आकारमानात वाढ करण्यात येणार आहे. शाळेच्या आवारात कंपोस्टिंग प्लांट बसवण्यात येणार आहे. जेणेकरून आवारातील इतर हरित कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल. तसेच आवारात प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. शाळा यामुळे पर्यावरणाला मदत होईल. या उपक्रमासाठी राज्यभरातून चार शाळांची निवड केली जाणार आहे. या योजनेला लागणारा खर्च नागरी शाळांच्या नियमित देखभालीच्या खर्चातून भागवला जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@