आ. निरंजन डावखरे यांच्याकडून कोकणात ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

    23-May-2022
Total Views |

ratnagiri ambulance
 
 
 
 
 
 
ठाणे : रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच राजापूर तालुक्यातील रुग्णांच्या सुविधेसाठी भाजप आ. निरंजन डावखरे यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
 
राजापूर तालुक्याला ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका गरजेची होती. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना मुंबई वा रत्नागिरीमध्ये हलविताना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार व प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका देण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर आ. डावखरेंच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील ‘सागर’ बंगल्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
 
 
 
त्यानंतर रुग्णवाहिका रत्नागिरीकडे रवाना झाली. या वेळी आ. निरंजन डावखरे, प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, सरचिटणीस अ‍ॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष श्रुती ताह्मणकर, सरचिटणीस अनुजा पवार, ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे सदर ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली असून ती राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत राहणार आहे.