जम्मू : मशिदीच्या बाहेरील बेकायदा लाऊडस्पीकरच्या आवाजाने हैराण झालेल्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी आता विरोध केला आहे. त्यानंतर जम्मूतील गांधी मेमोरियल गवर्नमेंट कॉलेजच्या जवळ सहा विद्यार्थ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांनी मशिदीबाहेर एकत्र येत हनुमान चालीसा पठण केले होते.
गांधी मेमोरिअल गव्हर्नमेंट महाविद्यालयातील विद्यार्थी ज्यावेळी हनुमान चालीसा पठण करत होते. गांधी मेमोरिअल गव्हर्नमेंट महाविद्यालयात गांधी मेमोरिअल गव्हर्नमेंट कॉलेजचे विद्यार्थी ज्यावेळी हनुमान चालीसा पाठ करत आहेत. त्या दरम्यान, मशीदीत गांधी मेमोरिअल गव्हर्नमेंट महाविद्यालयातील विद्यार्थी हनुमाना चालीसा पठण करत होते. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की भोंग्यांमुळे आम्हाला अभ्यासादरम्यान त्रास होतो. इथल्या गोंगाटामुळे आम्हाला अभ्यास करता येत नाही, त्यामुळे हा विरोध सुरू आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, १७ मे रोजी जम्मू नगर निगमतर्फे धार्मिक कार्य आणि सार्वजनिक ठिकाणच्या बेकायदा भोंग्यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक नरोत्तम शर्मा यांनी मांडला होता. तरीही बेकायदा मशिदींवरील भोंगे हटवण्यात आलेले नाहीत. ध्वनिप्रदुषणामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इथले महापौर मेअर चंदर मोहन गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र, अद्याप बेकायदा भोंगे हटवण्यात आलेले नाहीत. लाऊड स्पीकर हटवण्यात न आल्यामुळे स्थानिक प्रशासनावर विद्यार्थी नाराज होते. त्यामुळे हनुमान चालीसा पठणाद्वारे आंदोलन सुरू केले. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले असल्याची प्रार्थमिक माहिती आहे.