पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी ‘सीबीआय’ने छापेमारी केली. २००४ ते २००८ या काळात राजद नेते लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरती घोटाळ्याच्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमधील यादव यांच्या एकूण १७ मालमत्त्वांवर ‘सीबीआय’ने छापेमारी केली आहे.
या सगळ्यादरम्यान लालूप्रसाद यादव यांच्यावर एक नवीन गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांच्या कार्यपद्धतीवर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच २००९ मध्येही त्यांनी या प्रकरणी ‘सीबीआय’ चौकशीची मागणी केली होती. ममता बॅनर्जी यांनी केले. आपण पाहातो की, मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भरकटवणे हे काही पक्षांचे काम होऊन बसले आहे. आपण त्यांच्या जाळ्यात न अडकता त्यांच्यापासून सावध राहायला हवे.” “आपण आता पुढील २५ वर्षांसाठीचे उद्दिष्ट निश्चित करत आहोत. आता वेळ आली आहे की, भाजपने पुढील २५ वर्षांसाठीचे ध्येय निश्चित करायला हवे. हे ध्येय सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहणे आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणे हे असायला हवे,” असे मोदी म्हणाले.
विरोधकांचा समाचार घेताना मोदी म्हणाले की, “निवडणुकीच्या मैदानात विकासाची चर्चा ही सर्वच राजकीय पक्षांना करावीच लागली. मला गर्व आहे की, भाजपचे राजकारण हे सदैव विकासकेंद्रितच राहिले. पण, काही लोकांना या विकासवादाच्या राजकारणाच्या मार्गावर कालांतराने का होईना यावेच लागले. मात्र, त्या लोकांनी तर राजकारणातील विकासवादालाही विकृतीच्या दिशेने ढकलून दिले. अशाच काही राजकीय पक्षांनी देशाच्या, राज्याच्या आणि तरुणांच्या उज्ज्वल भवितव्याशी खेळ केला.
एवढेच नव्हे, तर या राजकीय पक्षांनी समाजातील वाद, कुरबुरी यांना शोधून शोधून त्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. कधी जातीच्या नावाने, तर कधी प्रादेशिकवादाच्या नावाने लोकांना भडकावण्याचे उद्योग या राजकीय पक्षांनी केले.” म्हणूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करणार्या भारतीय जनता पक्षाला अशा समाजद्वेष्ट्यांपासून लोकांना सावध करावे लागेल,” असे आवाहन यावेळी मोदींनी भाजपच्या पदाधिकार्यांना केले.