देशपांडे, धुरींवरील आरोप तथ्यहीन! : न्यायालयाची चपराक

    21-May-2022
Total Views |

MNS
 
 
 
 
 
 
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन पोलीसांना फटकारले आहे. हा गुन्हा एका काल्पनिक प्रकरणावर आधारीत असून तथ्यहीन असल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने म्हटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
 
शनिवारी या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने थेट पोलिसांनाच चपराक लगावली आहे. हे प्रकरण काल्पनिक असून तथ्यांवर आधारलेले नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
 
 
 
दोघांवरही करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळून आले. कोठडीसाठी कोणत्याही प्रकराची ठोस कारणे दिसून आली नाही त्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या कल्पनाशक्तीच्या आधारे खटला दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जाणीवपूर्वक कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असे निरिक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.