ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी (१९ मे रोजी ) ताब्यात घेतले होते.
त्यानंतर केतकी चितळेला आज (२० मे रोजी) न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअँपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि एसएमएसच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे पोलिसात तपासात स्पष्ट झाले आहे.