रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2022   
Total Views |
tig

मुंबई(प्रतिनिधी): राजस्थानमधील रामगढ विषधारी अभयारण्य सोमवारी दि. १६ रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गेल्या वर्षी 5 जुलै रोजी रामगड विषधारी अभयारण्य आणि लगतच्या परिसरांना व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रानंतर हा राजस्थानमधील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. तर, भारतातील 52वा व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प १५०१.४९ चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे. नव्याने अधिसूचित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ईशान्येकडील रणथंबोर आणि दक्षिणेकडील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पामधील वाघांच्या अधिवासाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे रणथंबोरमधील अतिरिक्त व्याघ्र लोकसंख्या नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात अंदाजे २,९६७ वाघ आहेत.
चौकट:
रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात भारतीय लांडगा, बिबट्या, पट्टेदार तरस, अस्वल, सोनेरी कोल्हा, चिंकारा, नीलगाय आणि कोल्हे यासारखे वन्य प्राणी राहतात.
कोट :
"रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प हा संशोधन आणि शिक्षणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भीमलत, रामगढ पॅलेस यासारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांमुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. आणि स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील," असे मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सेदू राम यादव यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@